आमच्याबद्दल
शाश्वत विकासाच्या दिशेने, गावातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून
सविनय नमस्कार,
सारणी (सांगवी) गावचे दैवत श्री बिनगीर बाबा संजीवन समाधी या गावांमध्ये आहे. गावांमध्ये हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, भवानी आईचे मंदिर, बिरोबाचे मंदिर, समाज मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, माळ्याचे आई मंदिर, वेताळबुवा मंदिर व मज्जिद आहेत.
गावामध्ये वंजारी, मराठा, मुस्लिम, धनगर, बौद्ध, मातंग, सोनार, सुतार, तेली, परीट, न्हावी, चांभार, कुंभार, ब्राह्मण, वाणी, कोळी सर्व जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. साधू संतांची गाव म्हणून सुद्धा ओळख आहे. गावामध्ये मोठा तलाव आहे. तलाव असल्यामुळे शेतीमध्ये ऊस, केळी, फळबाग असे सर्व प्रकारचे पिके घेतले जातात म्हणूनच गाव बागायतदाराचे गाव म्हणून ओळख आहे.
विशेष म्हणजे केळीचे पीक हे गावातच घेतले जाते. ती केळी गावातच पिकवली जाते व नंतर आसपासच्या बाजारामध्ये विकली जाते. याचाच अर्थ असा उत्पन्न घेणारा, पिकवणारा व विकणारा गावातूनच होते. म्हणून गावाला व्यापारी गाव म्हणूनही तालुक्यामध्ये ओळख आहे. कापसाचा व्यापार, सोयाबीनचा व्यापार, भाजीपाल्याचा व्यापार भरपूर प्रमाणामध्ये गावामध्ये केला जातो.
शाळा
दत्त मंदिर
बिनगीर बाबा मंदिर
बंधारे
आमचे ध्येय आणि ध्येयवाद
दृष्टी
Vision
ला एक आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे जिथे प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले जाईल, शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक विकास साधला जाईल आणि गावाची परंपरा आणि संस्कृती जपली जाईल.
उद्देश
Mission
पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासन राबवणे, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे.
आमचे मूल्ये
आमच्या कार्याचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक तत्त्वे
पारदर्शकता
सर्व निर्णय आणि कार्यवाही पारदर्शक आणि जबाबदार
नागरिक केंद्रित
नागरिकांच्या गरजा आणि हितसंबंध प्रथम
नावीन्य
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण उपाय
सेवाभाव
नागरिक सेवेसाठी समर्पित आणि कटिबद्ध
आमची कामगिरी
गेल्या वर्षात आम्ही साध्य केलेले महत्त्वाचे उद्दिष्टे आणि उपलब्धी
100% डिजिटल सेवांचे
सर्व नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या
95% शिक्षण दर
गावातील मुलांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारली
स्वच्छ गाव पुरस्कार
राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक
संपर्क केंद्र
सारणी (सांगवी) ग्रामपंचायत
ग्राम विकासाच्या प्रक्रियेत आपले सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे. आमच्याशी संपर्क साधून सहभागी व्हा.
पत्ता
सारणी (सांगवी), ता. केज, जि. बीड, महाराष्ट्र - 431123
दूरध्वनी
+91 7420932811
ईमेल
gpsarnisa@gmail.com
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार : सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30
आमचे स्थान
सारणी (सांगवी), ता. केज
संदेश पाठवा
आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या